vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

        जालना,  (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आल्याचे आदेश प्र. अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

 

संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 14 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

सुखकर प्रवासासाठी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक-असे मत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव

vishwatmaklokswamivarta

बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी :पुण्यातील खालकर मारुती मंदिरात मनसेकडून महा आरती संपन्न … लगेच पोलिसांकडून अटक

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर