vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सुखकर प्रवासासाठी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक-असे मत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव

 सुखकर प्रवासासाठी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक-असे मत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव

 

[ सांगली प्रतिनिधी : दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वांनी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान फक्त अभियाना पुरते मर्यादिन न राहता वर्षभर राबवावे, असे मत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी हेल्मेट जनजागृती रॅलीच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय माधवनगर येथे हेल्मेट जनजागृती रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. सुरक्षित वाहने चालवा, अपघात टाळा, हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा, असा संदेश देत सांगली पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीने सांगली शहरातून हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीची सांगता नूतन पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झाली.

 

या कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपअधीक्षक (होम) डॅनियल बेन, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळे, मोटर वाहन निरीक्षक असिफ मुलानी, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे उप-महामादेशक अनिल शेजाळे, उद्योजक सुरेश इरळे, वाहन निरीक्षक प्रशांत इंगोले, आकाश गालींदे, रवींद्र सोळंकी, रोहन सासणे तसेच सहा. मोटर वाहन निरीक्षक कल्याणी बावडेकर, अश्विनी पाटील, नेहा बारपटे, योगिता बारपटे उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

पणजी (गोवा) येथे ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीनेजागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

उमेद’ विभागीय, जिल्हा मिनी सरस महोत्सवाची सांगता;सांस्कृतिक कार्यक्रम, विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

बोखारा ग्रामपंचायतीतील  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स- 25 पैकी 23 गुदमरुन दगावले, आग लागल्यावर कर्मचारी का पळाले नाहीत? मृतांमध्ये दोघे महाराष्ट्राचे,  यादी

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात ६७ कोटी ४३ लक्ष रुपयांचे वाटप

vishwatmaklokswamivarta