vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९१० तक्रारी प्राप्त; यापैकी ८९९ निकाली ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९१० तक्रारी प्राप्त; यापैकी ८९९ निकाली ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

 

 मुंबई, राज्य प्रतिनिधी : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ९१० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

 

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

-: दुःखद बातमी :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड*

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला करार

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

जागतिक वारसा स्थळा’च्या यादीत कातळशिल्पांचा समावेशासाठी रोडमॅप तयार करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

पत्रकारांच्या आरोग्य साठी नगरसेविका आशाताई मराठेचे एक पाऊल पुढे..