vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

मुंबई, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर येथे २१ ऑक्टोबर रोजी आणि कालिदास नाट्यगृह (मुलुंड) येथे २२ ऑक्टोबरला दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम साकारले जात आहेत.

दादर येथे आयोजित कार्यक्रमात जगदिश खेबुडकर, ग. दि. माडगुळकर व मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपट गीत व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम ‘दिवाळी पहाट त्रिवेणी संगीत’ या विशेष संकल्पनेवर आयोजित सादरीकरण करण्यात येणार आहे. ख्यातनाम गायक दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, प्रसिद्ध गायिका शाल्मली सुखटणकर, सोनाली कर्णिक, निवेदक अमित काकडे हे सादरीकरण करणार आहेत.

कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांचा ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’ या विशेष संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, गायिका शाल्मली सुखटणकर व प्राजक्ता सातर्डेकर सहभागी होतील. निवेदन मिलिंद कुलकर्णी यांचे असून, संगीत संयोजन दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांचे आहे.

सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, अधिकाधिक रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे

0000

संबंधित पोस्ट

नमस्ते दिवस’ म्हणजे स्वच्छताकर्मींच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

महानगर गॅस लिमिटेड कंपनीला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गावागावात शाखा स्थापन करणार – सचिन आडे पाटील

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta