vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

-: दुःखद बातमी :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड*

-: दुःखद बातमी :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड*

ठाणे प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांचे १४ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नेरूळ, नवी मुंबई येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.

गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते.

मा. कुलथे साहेबांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुनियाद को ऑ हाऊसिंग सोसायटी २ रा मजला, सेक्टर १५ ,नेरूळ (पूर्व ), नवी मुंबई(Opposite Apeejay School Nerul) येथे सकाळी ९ ते १२.३० या दरम्यान ठेवण्यात येणार आहे.मा. कुलथे साहेबांच्या पार्थिवावर उद्या दि. १५/४/२०२५ रोजी दुपारी १.०० वा. नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-४ , नेरुळ( पश्चिम), नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील.सर्व संघटकाचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संघटन चळवळीतील महामेरू सन्मानीय ग. दि. कुलथे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!शोकाकुल – संपूर्ण राजपत्रित अधिकारी महासंघ परिवार

संबंधित पोस्ट

डब्ल्यू डब्ल्यू एफ तर्फे एक पेन एक वही महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्याविविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा- प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा..- हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा- प्रस्तावित प्रकल्पांच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा

पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

शासकीय मुलींचे वसतिगृह येथे विनामुल्य प्रवेश अर्ज वाटप सुरु