राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटा चा एबी फॉर्म अखेर नवाब मलिकांनी मिळाला- उमेदवारी अर्ज दाखल…
मुंबई प्रतिनिधी
शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी आमदार नवाब मलिक यांनी दाखल केले होते दोन अर्ज एक अपक्ष आणि एक पार्टीच्या नावे परंतु अधिकृत रीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एबी फॉर्म दिला नव्हता यामुळे तीन वाजेपर्यंत पक्षाच्या अर्जाच्या एबी फॉर्म ची वाट बघत आहे असे नवाब मलिक म्हणाले होते त्यानंतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते या वेळेला त्यांना एबी फॉर्म मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे
[ प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने अखेर त्यांना एबी फॉर्म दिला आहे. नवाब मलिक यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते. आपल्याला अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला नाही. जर 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही तर आपण अपक्ष लढणार असं नवाब मलिक यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना अजित पवार गटाकडून पार्टीचा एबी फॉर्म देण्यात आला
[ कोणाचा विरोध, कोणाचं समर्थन हा विषय नाही. लोकांच्या आग्रहामुळे मी येथे निवडणूक लढत आहे. आधी मी निवडणूक लढायचं नाही असं ठरवलं होतं. पण या मतदारसंघाची परिस्थिती चिंताजनक आहे. झुंडशाही, गुंडशाही, ड्रग्जचा कारभार, लहान मुलं ड्रग्ज घेत आहेत. तुम्ही लढल्याशिवाय येथील परिस्थिती बदलणार नाही असा त्यांचा आग्रह आहे. यावेळी ते म्हणाले होते
संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले. माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासोबत उभं राहावं. पण काहीही परिस्थिती असली तरी मी लढणार आणि जिंकणार. रेकॉर्डब्रेक मतांनी मी जिंकेन. माझी मुलगी राष्ट्वादीकडून अणुशक्तीनगरमध्ये लढत आहे. मी येथे लढत आहे. कोण समोर आहे याची चिंता नाही. दोन्ही ठिकाणी बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.