vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

मुंबईत सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ  माजी विरोधी पक्ष नेते पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा यांचा भाजपामध्ये प्रवेश…

मुंबईत सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ  माजी विरोधी पक्ष नेते पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा यांचा भाजपामध्ये प्रवेश…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी वरिष्ठ काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती यावेळी यांच्यामार्फत देण्यात आली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये माजी विरोधी पक्ष नेता पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा हे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर मुंबईतील एक मोठी ही जबाबदारी देण्यात आली रवी राजा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे-

 मुंबईतील सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्याकडे संघटनेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. रवी राजा यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष सोडण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रवी राजा यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्यासोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. मोठा जनसंपर्क आहे. भाजपला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात काँग्रेस मधील आणखी काही प्रवेश भाजपमध्ये होतील. येत्या काळात आणखीनही लोक भाजपात येणार आहेत, वेळ आली की त्यांची नावं जाहीर होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

संबंधित पोस्ट

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

आजपासून सुरू होणारं विधिमंडळ अधिवेशन.:भरत गोगावले यांनी बजावला 55 शिवसेना आमदारांसाठी ‘व्हिप’

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती मुंबईतील के ई एम हॉस्पिटल मध्ये साजरी…

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाचा प्राथमिक आखणी अहवालास या बैठकीत मान्यता… एम एम आर डी ए

vishwatmaklokswamivarta

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.