vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी-निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे, दस्तावेज तपासणीकरिता सादर करावीत

193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी-निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे, दस्तावेज तपासणीकरिता सादर करावीत

 

रायगड प्रतिनिधी-लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 77 खाली निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक निकालाच्या तीस दिवसांच्या आत उमेदवाराने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने ठेवलेल्या निवडणूक खर्चाचा (जोडपत्र 26 ) हिशेब मा.खर्च निरीक्षकांकडे दाखल करणे बंधनकारक असून उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना मा.निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

तथापि उमेदवाराला प्रचार मोहिमेदरम्यान किमान तीन वेळा पदनिर्देशित खर्च निरीक्षक किंवा इतर कोणत्याही निवडणूक प्राधिकाऱ्यास तपासणीसाठी विविध केलेल्या नोंदवह्या सादर कराव्या लागतील. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक तपासणीनंतर उमेदवारांची दैनंदिन निवडणूक खाते, नोंदवही तपासणीच्या दिनांकापर्यंत स्कॅन करण्यात येईल.

मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, 193-श्रीवर्धन विधानसभा सतीश कुमार एस हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत.

मा.निवडणूक खर्च निरीक्षक, 193-श्रीवर्धन विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- पहिली तपासणी, दि.09 नोव्हेंबर 2024 दुसरी तपासणी दि.12 नोव्हेंबर 2024, तिसरी, दि.17 नोव्हेंबर 2024 स्थळ:- श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय भवन, ता.श्रीवर्धन.निवडणुक खर्चाच्या उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खाते नोंदवही (भाग 1 2 3) पहिली तपासणी (First Inspection) दि.09 नोव्हेंबर 2024 रोजी मा.खर्च निरीक्षक, 193-श्रीवर्धन यांच्याकडून होणार असल्याने दि. 07 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा सर्व हिशेब उमेदवार खर्च नोंदवहीमध्ये नोंदवून स्वतः उमेदवार किंवा आपण नेमणूक केलेल्या निवडणुक प्रतिनिधी यांना दि.08 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणुक खर्चाची नोंदवही घेऊन उमेदवार दैनंदिनी खर्च पथकाकडे छाननी तपासणी करीता श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकिय भवन येथे पाठविण्यात यावे. जेणेकरुन सदर नोंदवह्यामध्ये काही दुरुस्त्या असल्यास त्याचे वेळीच निराकारण करता येईल

संबंधित पोस्ट

जितेंद्र अग्रवाल यांनी मुंबई मॅरेथॉन चार तास तेरा मिनिटात पूर्ण केली!शंभर दिवसाच्या आत तिसरी फुलमॅरेथॉन पूर्ण करणारे जालन्यातील पहिलेच धावपटू

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

गिरण्यांच्या जागेवरील चाळीच्या सद्य:स्थितीबाबत पाहणी करणार- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे