vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

रायगड प्रतिनिधी:- धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत दि.8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्ससाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामनिधी, खोपोली येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन (दि.9 सप्टेंबर रोजी) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते झाले.या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती नेहा भोसले, तहसिलदार कर्जत डॉ.धनंजय जाधव, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण, श्रीमती तेजस्विनी गलांडे हे मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी प्रशिक्षणार्थीना संबोधित करताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील 113 आदिवासी वाड्यांमध्ये सर्वसमावेशक योजना राबवून वाड्यांचा समृद्ध विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि मास्टर ट्रेनर्सना आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी स्वतः प्रत्येक तालुक्यातील दोन वाड्यांना भेट देऊन ग्राम विकास आराखड्यांचा आढावा घेणार असून, सर्व 113 वाड्यांचे आराखडे स्वतः तपासून शासनाकडे सादर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये तालुकास्तरावरील 71 मास्टर ट्रेनर्सना जनजातीय गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य व माहिती प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये विविध योजना, समुदाय संवाद, ग्रामविकास आराखडा निर्मिती आणि नेतृत्व क्षमता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांच्या शाश्वत आणि समावेशी विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून या उपक्रमामुळे स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग वाढून, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे

संबंधित पोस्ट

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश..

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण*