vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

राज्य प्रतिनिधी-

मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

 या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये.

मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, तसेच मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा भाग व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे· फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर