
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज आकाशवाणीवर-रेडिओ एफ.एम ९०.८ वर मुलाखत..
राज्य प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांना माहिती देण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि.९ रोजी सकाळी साडे अकरा वा. आकाशवाणीच्या एफ. एम. १०१.७ या वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीचे वृत्तसंपादक समरजीत ठाकूर यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत जिल्ह्यातील प्रशासनाचे विधानसभा निवडणूकीसाठीचे नियोजन, निर्भय निष्पक्ष निवडणूकीसाठी केलेल्या उपाययोजना तसेच मतदार जनजागृतीसाठीचे आवाहन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रेडिओ एफ.एम ९०.८ वर- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांना माहिती देण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत एमजीएम एफ एम ९०.८ वर शनिवार दि.९ रोजी सकाळी ९,दुपारी ३ वाजता व सायंकाळी ६ वा प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज जिल्ह्यात विधानसभा निवडणूक विषयक प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सुनिल शिरसीकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे.
०००००



