vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी आज शुक्रवारी सकाळी जुना जालना भागात पदयात्रा करत मतदारांशी संवाद साधला

जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी  जुना जालना भागात पदयात्रा करत मतदारांशी संवाद साधला…

 

जालना (प्रतिनीधी) जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी जुना जालना भागात पदयात्रा करत मतदारांशी संवाद साधला.ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या पदयात्रे दरम्यान आ. गोरंटयाल यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करून विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला.

जुना जालना भागातील छत्रपती संभाजी उद्यान जवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सहभागी झालेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ.कैलास गोरंटयाल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, विकास का पन्ना लिखेंगे कैलास अण्णा आदी घोषणा देत मतदारांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती संभाजी उद्यान येथून काढण्यात आलेली ही पदयात्रा पंचायत समिती कार्यालय, मुक्तेश्वर द्वार, कचेरी रोड, गणपती गल्ली चौक, शनी मंदिर चौक, टाऊन हॉल या मार्गे जाऊन गांधी चमन येथे समाप्त करण्यात आली. या पदयात्रे दरम्यान उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी मतदारांसह विविध व्यावसायिक, व्यापारी आदींच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधत येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला भरघोस मतांनी विजयी करण्याचे साकडे मतदारांना घातले. पदयात्रा मार्गावर उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांचे अनेक महिला भगिनींनी औक्षण करुन मिठाई भरवत स्वागत केले. पदयात्रा गांधी चमन येथे पोहचल्यानंतर उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी महात्मा गांधी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या पदयात्रेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, महावीर ढक्का, बदर चाऊस, शेख शकील, दिनकर घेवंदे, अब्दुल रफीक,वाजेद पठाण, गंगुबाई वानखेडे, मंगलबाई खांडेभराड, विजय पवार, रावसाहेब अवघड, गणेश वाघमारे, संजय भगत, गजानन लाड, संतोष कुंडलकर, संतोष औरंगे, साईनाथ जैस्वाल, योगेश लाड, शिवराम सतकर, संतोष माधोवाले, किशोर गरदास, पुरुषोत्तम बिंगी, शेख वसीम, व्यंकटेश चित्राल, अमजद पठाण, नरेश गोगडे, बाळू लाड, रामेश्वर लाड, योगेश पाटील, अमोल सरोदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट

श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात राम नवमी दिवशी दुर्घटना; अनेक भाविक विहिरीत पडल्याची भीती

मुलांनी फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी राहावे – न्यायाधीश सुनीता तिवारीकौटुंबिक न्यायालय रंगले… बालकांच्या किलबिलाटात…

vishwatmaklokswamivarta

बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार– मंत्री सुधीर मुनगंटीवार बांबूनिर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करा -उपमुख्यमंत्री

आता राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा प्रेम, आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया