vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा प्रेम, आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा-प्रेम, आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया..

मुंबई, प्रतिनिधी- राज्यात गुढीपाडव्या पाठोपाठ रमजान ईद हा सण उत्साहाने साजरा होत आहे. पवित्र अशा रमजान ईद सणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो. या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होवून त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त करतानाच त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद-उल-फित्र हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जीवनातील चांगल्या मुल्यांचा उत्सव आहे. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन, एकमेकांशी प्रेम आणि आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

 

संबंधित पोस्ट

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार समिती बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय!केंद्रीय मंत्रिमंडळाने GOBARdhan या भारताच्या राष्ट्रीय एकात्मिक संपीडित बायोगॅस (CBG) योजनेला ₹२३,७३१ कोटींच्या खर्चास मंजुरी…

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.