vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे यावेळी आपला विजयही विराट होणार – खोतकर

जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे यावेळी आपला विजयही विराट होणार – खोतकर

 

जालना प्रतिनिधी:

मागील पाच वर्षात जनतेला तोंडही न दाखविणारा काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीतही लोकापर्यंत पोहोचू शकलेला नाही. याउलट शहरातील 30 वार्डांमधील प्रत्येक कॉलनी आणि ग्रामीण भागातील सर्व गावे, तांड्यावर जाऊन आपण प्रत्यक्ष भेट देऊन जनतेचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे लोकांमधून होत असलेले उत्स्फूर्त स्वागत हीच आपल्या विजयाची साक्ष असल्याचे महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी म्हटले आहे.

श्री.खोतकर यांनी मौजपूरी, पाहेगांव, निरखेडा व तांडा, लक्ष्मीनगर तांडा, दहीफळ, मंठा रोड प्रजापती ब्रम्हाकुमारी परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी युवा, महायुती, महिला आघाडी, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची जालन्यात विराट सभा झाली. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी काँग्रेस उमेदवाराकडे अक्षरशः पाठ फिरविली आहे. महिलांच्या योजना बंद करू पाहणार्‍या काँग्रेसच्या उमेदवाराला आपण मतदान करणार नाही असे महिलांनीच ठरवून टाकले आहे. जालना मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे उद्योजक, व्यापारी आणि सर्व जालनेकरांना विकासाचा विश्वास निर्माण झाला आहे. शेतीसाठी मागेल त्याला सौर पंप, शेततळे योजना सुरू आहे. शेतकर्‍यांना आता पंधरा हजार रुपये अनुदान वाढ दिली जाणार आहे. मुलींसाठी, महिलांसाठी, वृद्धांसाठी, शेतकर्‍यांसाठी, अपंगांसाठी, तरुणांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी आता वाढीव आर्थिक तरतूदही केली जाणार आहे. त्यामुळे सर्व समाजघटकांचा विश्वास महायुतीच्या सरकारने जिंकला आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जालना मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे जालना शहर आणि ग्रामीण भागाचे भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही.

कपटनीतीचा वापर

पराभव दिसू लागल्याने आपल्या विरोधकाकडून कपटनीती सुरू झाली आहे. स्वतः केलेल्या विकासाचे एकही उदाहरण सांगता येत नसल्याने खोटेनाटे आरोप करून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण लोकांनी या कांगावाखोर काँग्रेस उमेदवाराला ओळखले आहे. आमदार नसतानाही आणि केवळ एक वर्षाच्या आतच 400 कोटीचा निधी आणने सोपे काम नाही. शहरांमध्ये सुरू झालेल्या या विकास कामामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे.

शेतकर्‍यांचा कारखाना सुरू करणार,भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर येतात की खाली हेही ठाऊक नसलेल्या काँग्रेस उमेदवाराकडून रामनगर साखर कारखान्याबद्दल दिशाभूल केली जात आहे. निवडणूक झाल्यानंतर आपण पहिले प्राधान्य कारखाना उभारणीस देणार आहोत. राज्यात आणि देशातही युतीचे सरकार राहणार असल्याने कारखाना उभारणीस कोणतीही अडचण आता येणार नाही. हातवणसारखा सिंचन प्रकल्पही उभा राहणार आहे. आपल्या परिसरात उसाचे क्षेत्र वाढणार आहे. कारखाना उभारल्यानंतर रामनगर परिसर पुन्हा शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक यांच्या गर्दीने फुलणार आहे. दरम्यान शहर आणि ग्रामीण भागातून मिळत असलेला उत्स्फूर्त आणि वाढता पाठिंबा लक्षात घेता आपला विजयसुद्धा मोठा होणार असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पक्ष ( खोरीपा ) तर्फे पत्रकारांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची पाडळीत सुरवात

नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत जनजागृती मनपा आयुक्ताकडून जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित 

vishwatmaklokswamivarta

मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाथ्रीकर कॅम्पसला भेट..

vishwatmaklokswamivarta

4 वर्षात 700 जम्मू-काश्मीर तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती; अजूनही 141 दहशतवादी सक्रिय