vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये नवी मुंबईत अनधिकृत बॅनर्स / होर्डींग हटविण्याची विशेष मोहीम..

25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये नवी मुंबईत अनधिकृत बॅनर्स / होर्डींग हटविण्याची विशेष मोहीम..

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   मा. न्यायालयाने दि. 9 ऑक्टोबर रोजीच्या जनहित याचिका क्र. 155/20211 बाबत दिलेल्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स / होर्डींग्ज हटविण्याची विशेष मोहीम 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. ही मोहीम सर्वच आठही विभागांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून यामध्ये परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार आहेत.

  या मोहीमेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार असून निष्कासन खर्चासाठी आलेली दंडात्मक रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.

  महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 अन्वये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विनापरवागी अनधिकृतरित्या होर्डींग / बॅनर लावणे हे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहचविणारे असून या मोहीमेनंतरच्या कालावधीत विनापरवानगी होर्डींग / बॅनर लावण्यात येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे. अन्यथा सदर अधिनियमाव्दारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.

याविषयी कोणत्याही नागरिकास सूचना / तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील ग्रिव्हेन्स रिड्रेसल पोर्टलवर अथवा My NMMC या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ॲपवर अथवा 8422955912 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नागरिक आपली तक्रार / सूचना नोंदवू शकतात.तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या शहराचा स्वच्छ व सुंदर शहर हा नावलौकिक टिकविण्यासाठी व वृध्दींगत करण्यासाठी शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

उसतोड कामगारांच्या कष्टाप्रती समृद्धीने व्यक्त केली कृतज्ञताऊसतोड कामगार परिवाराचा सतीश घाटगे यांच्याकडून सपत्नीक सन्मान.. जिल्यात पहिल्यांदा झाला ऊसतोड कामगार परिवाराचा सन्मान सोहळा

vishwatmaklokswamivarta

पाली नगर पंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर

पालकमंत्र्यांनी घेतला सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असून विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta