राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल हा अनाकलनीय आहे, असा नाराजीचा सूर विरोधकांकडून उमटताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी इव्हीएम मशीनबाबत आरोपांची सरबत्ती केली आहे. यावेळी ते म्हणाले की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी सेटिंग असल्याचे आम्हाला संशय आहे यासाठी ईव्हीएम च्या विरोधात आम्ही जन आंदोलन उभे करणार आहोत आणि ईव्हीएम हटाव आणि ब्लेड पेपरवर निवडणूक घेण्याचे आम्ही लवकर न्यायालयात जाणार आहोत महाविकास आघाडीची वकिलाची टीम आता या संदर्भात तयार होत आहे लवकरच या संदर्भात तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावर विरोधी पक्ष नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभेच्या झालेल्या निवडणूक मतमोजणीवर संशय व्यक्त जात आहे. दरम्यान हाच मुद्दा आता महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.