vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर चालत्या गाडीतच खून..

पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर चालत्या गाडीतच खून..

 

पुणे प्रतिनिधी-भारतीय जनता पार्टचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर चालत्या गाडीतच खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालत्या गाडीत खून केल्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर धावत्या गाडीतच त्यांचा तिक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा सतीश वाघ यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्माला अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ यांच्या अपहरण व खून प्रकरणात पाच आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार-सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांनीच सतीश वाघ यांचे अपहरण केलं. ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी दोन जणं आधीपासूनच होते, अशीही माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अन्य एकाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करत हत्या करण्यात आली होती. योगेश वाघ यांच्या शरीरावर अनेक वार तर डोक्यात लाकडी दांडके मारत हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. 9 डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करत सतीश वाघ त्याच्या थोड्या वेळानंतरच हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली. हत्या करत मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरुन शिंदवणे घाटात आणून टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली केलेली. आता असाच घटनाक्रम समोर येत आहे. अपहरण केल्यानंतर काही तासातच सतीश वाघ यांची हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमला अनेक पुरावे सापडले आहेत. त्यात रक्त लागलेले लाकडी दांडक्याचाही समावेश आहे. याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चौघांना त्बायात घेतलं आहे.

… त्यानंतर दोघांना अटक

पुणे क्राईम ब्रँच पथकाने 10 ते 15 जणांच्या चौकशीनंतर पवन शर्मा आणि नवनाथ गुळसाळे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात घेतलं आहे. या दोघांपैकी शर्मा हा मुख्य सूत्रधार ही असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांची 16 पथके आरोपीच्या मागावर आहेत. पुणे पोलिसांनी ह्यूमन इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोपींचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित पोस्ट

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ” – डॉ सुकेश झंवर

vishwatmaklokswamivarta

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

जनकल्याण दहिसर एसआरए सहकारी गृह संस्थेतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात २७ जानेवारीपासून उपोषण करणार

vishwatmaklokswamivarta

देशाचे मोठे व्यावसायिक गौतम अडाणी यांनी दिली नवी मुंबई विमानतळाला ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज