vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वस्त्रोद्योग विभागात रोजगार निर्मितीला चालना देणार- मंत्री संजय सावकारे

वस्त्रोद्योग विभागात रोजगार निर्मितीला चालना देणार- मंत्री संजय सावकारे

 

मुंबई, प्रतिनिधी : वस्त्रोद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. वस्त्रोद्योग विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना देवून राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये हा विभाग मोलाचा वाटा उचलेल, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. सावकारे यांनी आज मंत्रालयात विभागाची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. वस्त्रोद्योग विभागातील विविध योजनांना गती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केली.विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती व माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

00000

 

oooo

संबंधित पोस्ट

राज्यात १०५ आगारे सुरु..१९ हजार कर्मचारी कामावर परतले!मंत्री, ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

शिवसेना २०२२ ची मुंबई महानगरपालिका  निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार ?

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

प. ठाणे येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी- राज्यपाल रमेश बैस राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस दिन साजरा

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

vishwatmaklokswamivarta