vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत!

 

        सांगली, प्रतिनिधी : नववर्षाचे स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा : वाचन पंधरवडा’ हा उपक्रम कार्यक्रम राबवून करणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली या कार्यालयामध्ये प्रेरणादायी व विद्यार्थांची जिज्ञासा वाढविणाऱ्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी किरण बोरवडेकर म्हणाले, ध्येय साध्य करावयाचे असल्यास प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला हवे. विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. अधिकतम वेळ पुस्तकांच्या सान्निध्यात व्यतित केला पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरीक्त साहित्याचे वाचन आवर्जून केले पाहिजे. त्यातून जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळते. वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरणपोषण व सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन पंधरवड्यांतर्गत साजरा होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविकामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा हेतू विषद केला. या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथप्रदर्शन 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थी व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचक व लेखक संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ग्रंथालयास भेट इत्यादी कार्यक्रम साजरे करुन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे सांगली जिल्ह्यातील 328 शासनमान्य ग्रंथालयांना सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच वाचन पंधरवड्यात विद्यार्थ्यांनी आवडीच्या पुस्तकाचे वाचन करुन त्यावर 500 शब्दांचा परीक्षणात्मक निबंध किंवा 5 मिनिटाचे कथन करावे. त्यातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देवून गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालय कार्यालयामध्ये ‘शांतता सांगलीकर वाचत आहेत’ हा एक तासाचा सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विजय भडके यांनी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

कल्याण प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरुणाने मारहाण करण्याआधी रिसेप्शनिस्टनेच -आरोपीच्या वहिनीला थोबाडीत मारली असल्याचे समोर आले…

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

मुंबई कुर्ला येथे*जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान**

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन,महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री ; मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक