vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत तापडीया नाट्यगृह निराला बाजार येथे दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दिव्यांगांचा तसेच दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब अरवत आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, दिव्यांग कल्याणासाठी शासकीय योजना, विभागाचे धोरण, कायदे, नियम, दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविणारे खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यास जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा येथील मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. मुख्याध्यापक कैलास निकम यांनी सूत्रसंचालन केले. यामिनी काळे यांनी आभार मानले.

 

०००

संबंधित पोस्ट

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज . त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार* *मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!*   *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस