vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाची पाहणी..

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाची पाहणी..

 

मुंबई प्रतिनिधी-

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारीअखेर खुले करु देता येईल, या दृष्‍टीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून आज या कामाची पाहणी मंत्री श्री. शेलार यांनी केली. यावेळी अकादमीच्‍या संचालक मीनल जोगळेकर यांच्‍यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

नुतनीकरण करताना कलावंत व प्रेक्षकांना अद्यावत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून रवींद्र नाट्य मंदिरात नाटक अथवा सिनेमा पाहता येणार आहे. त्‍यासाठी मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्‍यक असणारा डॉल्‍बी साऊंड सिस्‍टीमही उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तर नाटकांसाठी लागणारी साउंड सिस्‍टीमही अद्यावत करण्‍यात आली असून आसन व्‍यवस्‍थाही आरामदायी करण्‍यात आली आहे. मिनी थि‍अटरमध्‍ये अशाच प्रकारे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सिनेमासाठीही सर्व सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून नाटक, सांस्कृतिक, संगीत, साहित्यिक कार्यक्रमांसह मराठी सि‍नेमांसाठी ही दोन थिएटर उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

कलावंतांना जे आवश्‍यक आहेत, त्‍या पद्धतीने सुसज्‍ज असे मेकअप रुम व थिएटरच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून कलादालन व इतर दालने अत्‍यंत देखण्‍या स्‍वरुपात उभारली जात आहेत. शिवाय बाहेर छोटे खुले नाटयगृहही तयार करुण्‍यात येत आहे. या संपूर्ण वास्‍तूला मराठेशाहीचा साज चढवण्‍यात येणार आहे. तसेच आतील भागात मराठी कला संस्‍कृती व नाट्य परंपरेचा विचार करुन सजावट करण्‍यात येणार आहे. आज मंत्री ॲड आशिष शेलार यांनी या संपुर्ण कामाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले तसेच काही सूचनाही केल्‍या.

संबंधित पोस्ट

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारु प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू अनेकजण गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

जलसंपदा विभाग-रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी…