vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत-इस्राईल येथे रोजगाराची संधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत-इस्राईल येथे रोजगाराची संधी

 

मुंबई, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (including OJT) आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिका-यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंग (GDA/ANM/GNM/Bsc Nursing/Post Bsc Nursing) ची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

vishwatmaklokswamivarta

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठीवाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दुर्गम उळुंबमध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा मुक्काम**जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाने गावकरी भारावले*

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल