vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..

राज्य प्रतिनिधी घनसावंगी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून संपूर्ण महाराष्ट्रभर “महा रक्तदानाचा संकल्प” राबविण्यात आला. देवेंद्रजींचा वाढदिवस ‘उत्सव’ म्हणून नव्हे तर ‘उत्तरदायित्व’ म्हणून साजरा करत, घनसावंगी विधानसभा मतदारसंघात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीनही मंडळात भव्य रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरात २२८ भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक जबाबदारी निभावली.

घनसावंगी तालुक्यात समृद्धी साखर कारखाना येथे भाजपा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम उढाण यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रांजणी (जालना ग्रामीण) येथे मंडळ अध्यक्ष संजय आटोळे यांनी उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. तर शहागड येथे तालुका प्रमुख शिवाजी मोरे यांच्या वतीने शिबीर घेण्यात आले. या शिबिरास निवडणूक प्रमुख सतीश घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा विधायक उपक्रम “सेवा हीच संस्कृती” या भाजपच्या विचारधारेचे जिवंत उदाहरण ठरला आहे. या शिबिरासाठी शहागड घनसावंगी आणि रांजणी मंडळातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्तसंकलनासाठी जनकल्याण रक्तपेढी व लोकमान्य रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याबद्दल संपूर्ण टीमचा सतीश घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित पोस्ट

लम्पी आजाराच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच करा उपाययोजना; कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

राज्यातील 🌧️ कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर!

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी…आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश!

vishwatmaklokswamivarta

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिवादन*

गडचिरोलीचे ‘जलक्रांती’ मॉडेल राष्ट्रीय स्तरावर!*‘जिल्हाधिकारी पेयजल संवाद’ कार्यक्रमात सादरीकरण**दुर्गम नक्षलग्रस्त भागात नळ जोडणी कव्हरेज ८.३७ टक्क्यांवरून ९३ टक्क्यांवर*

vishwatmaklokswamivarta