vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जी एस टी  परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जी एस टी  परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई दि. 1 – केंद्र सरकारकडे असलेली महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी आणि मुंबईला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. एमएमआरडीएच्या परिसरात उद्धव ठाकरेंचा ‘मातोश्री’ आणि माझा ‘संविधान’ बंगला आहे. आम्ही जवळ राहणारे आहोत. आता जवळ नसलो तरी विकासासाठी आम्ही एकत्र यायला पाहिजे, असे मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

 

मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ना.रामदास आठवले यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्राच्यावतीने मुंबईला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी मदत करणार आहे. मुंबईतून आपल्या भारत सरकार ला अधिक महसूल मिळतो. मुंबईतील गर्दी पाहता मेट्रोचे जाळे उभे राहिल्यास लोकल सेवेवरील ताण कमी होईल. अनेक ठिकाणी रस्ते आणि उड्डाणपुलांचे काम सुरु आहे. ही कामं पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

 

मुंबईत पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांना जोडणारे एलबीएस रोड; पश्चिम द्रुत गती मार्ग आणि पूर्व द्रुत गती मार्ग आणि एसव्ही रोड यांना जोडणारे नवीन ब्रिज एमएमआरडीए ने उभरावेत अशी सूचना ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. केंद्रात पाठपुरावा करुन मी त्या पूर्ण करुन घेईन. तर जीएसटीचा परतावा हा महाराष्ट्राला टप्याटप्प्याने मिळेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्ट्यावर राहणार नजर…

vishwatmaklokswamivarta

मुंबई हादरली, 19 वर्षीय तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार, – शिवाजी नगर सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

हिंदू समाजाच्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा भव्य विराट मूक मोर्चा.. ..

vishwatmaklokswamivarta

कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा, लोकमान्य टिळक हे असीम प्रेरणेचा स्त्रोत: पंतप्रधान नरेंद्र मोदी