vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

 

राज्य प्रतिनिधी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार होईल यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावी, असे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी सांगितले.

मंत्रालयात मनरेगा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सचिव गणेश पाटील, उपसचिव ज. जि. वळवी तसेच विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कुशल आणि अकुशल कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच धडक सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधीच्या अडचणी असल्यास तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. गोगावले यांनी दिले.

 पीटीओची (प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर) माहिती सादर करण्याचे तसेच राबविण्याचे विभागातील विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात आणि १०० दिवसांत पूर्ण करावयाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश रोहयो मंत्री गोगावले यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक_तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’*जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे?* – मंदिर महासंघ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे ‘सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटलचे’ उद्घाटन करण्यात आले. 

vishwatmaklokswamivarta

पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी‘गावाकडचं.कॉम’ महिला बचत गट व शेतकर्‍यांसाठी ठरणार हक्काचे व्यासपीठ

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी