vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईसह कोकणात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश….

 मुंबईसह कोकणात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश….

 प्रतिनिधी,मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ९ जून ते १२ जून दरम्यान हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोविडसह इतर रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही आणि धोकादायक परिसरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर  एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याच्या तसेच ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

 

हवामान खात्याने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई आणि कोकणातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगण्यात आले आहेत.

दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा;  अलकायदाने दिली आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी

महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार….

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी- जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोन जणांना एनआयएकडून अटक

मुंबई मध्ये आज मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या अपडेट्स

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप