vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रस्ता सुरक्षा व पर्यावरण विषयक जनजागृतीपर वॉकेथॉनला दीड हजारहून अधिक नागरिकांचा उत्साही प्रतिसाद..

रस्ता सुरक्षा व पर्यावरण विषयक जनजागृतीपर वॉकेथॉनला दीड हजारहून अधिक नागरिकांचा उत्साही प्रतिसाद..

नवी मुंबई प्रतिनिधी- रस्ता सुरक्षा आणि वाहतुक नियमांचे नागरिकांनी पालन करावे तसेच पर्यावरणाचे रक्षण करावे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने अपोलो हॉस्पिटल्स, लेट्स सेलिब्रेट फिटनेस व द लर्नयार्ड यांनी आयोजित केलेली वॉकेथॉन 1500 हून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत यशस्वी केली.

 नेरूळ जिमखान्यापासून 5 किमी. परिसरात चालत जात सहभागी पर्यावरण व सुरक्षेविषयी जागरूक नागरिकांनी विविध जनजागृतीपर संदेश देणारे फलक उंचावित, घोषणा देत व्यापक स्वरूपात जनजागृती केली. यावेळी हरित शहर म्हणून नावलौकिक जपणारे नवी मुंबई शहर शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात अग्रभागी आहे आणि अग्रभागी राहणारच असा निश्चय प्रदर्शित करीत हरित शहराचा संदेशही नागरिकांनी दिला.

 रस्ता सुरक्षा सप्ताह दरम्यान वॉकेथॉन सारख्या उपक्रमाच्या आयोजनातून नागरिकांच्या मनात आरोग्यासाठी चालण्याचे महत्व अधोरेखित करून देण्याप्रमाणेच त्यांच्यामध्ये वाहतुक नियमांचे पालन करण्याविषयी जबाबदारीची भावना व सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत जागरूकतेचा प्रत्यय दिला.

संबंधित पोस्ट

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती सभापती पद आरक्षण निश्चितीसाठी दि.१६ रोजी बैठक

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका 23 शाळांचा निकाल 92.19% – महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश…नमुंमपा सानपाडा शाळेचा विद्यार्थी अभिराम राऊत 94.40% गुण संपादन करीत महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम..

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta