vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या वर्षातील महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालयस्तरावरील अनुसूचित जाती प्रवर्गाचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. सदर प्रलंबित अर्ज तपासणी करुन दि. 10 मार्च 2025 पर्यंत निकाली काढावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने,राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेले अर्ज महाविद्यालयांना पाठविण्यात येतात. महाविद्यालयांनी प्राप्त अर्जांची तपासणी करुन शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत करणे आवश्यक आहे. परंतु सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील 2 हजार 827 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.

यामध्ये हर्ष स्कुल ऑफ नर्सिंग खामगांव येथील 97, डॉ. राजेंद्र गोडे जीएनएम नर्सिंग स्कुल सागवान बुलढाणा येथील 92, एसएमएमबीएस सरस्वती नर्सिंग स्कुल चिखली येथील 82, श्री. शिवाजी आर्ट अँड सायन्स कॉलेज चिखली येथील 76, श्रीमती सुरजदेवी रामचंद्र मोहता महिला महाविद्यालय खामगांव येथील 73, पदमश्री डॉ. व्ही बी कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मलकापूर येथील 57, डॉ. लाहोटी नर्सिंग कॉलेज सुलताना लोणार येथील 53, माऊली ग्रुप ऑफ इन्सिटयुट कॉलज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी शेगांव येथील 35, विद्या संच्चिदानंद फुलेकर महाविद्यालय बुलढाणा येथील 33 व राजश्री शाहु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बुलढाणा येथील 31 अर्ज प्रलंबित आहे.

  महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तपासणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या लॉगीनला दि. 25 ऑगस्‍टपर्यंत पाठवावे. त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थी लॉगीनला परत करावेत. महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 10मार्चपर्यंत निकाली काढण्यात यावे. महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयीन प्राचार्य यांची आहे. प्रलंबित अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून सर्व पात्र अर्ज मंजूर करण्यात यावी. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज राहणार नाही, याची दक्षता घेण्यात घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर- शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात थांबलेली असतानाची घटना…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं, आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनखाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा