vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधान परिषद लक्षवेधी सूचना :गडचिरोलीतील राईस मिल अपव्यवहार प्रकरणी कठोर कारवाई होणार– राज्यमंत्री योगेश कदम

विधान परिषद लक्षवेधी सूचना :गडचिरोलीतील राईस मिल अपव्यवहार प्रकरणी कठोर कारवाई होणार– राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. विधानपरिषदेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अपव्यवहार करणाऱ्या राईस मिल धारकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. काहींवर दोन कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असला तरी, अद्याप तो भरलेला नाही. त्यामुळे संबंधितांवर आणखी कठोर पावले उचलली जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाऊन काही प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी असल्याचे निदर्शनास आल्यास, मकोका (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असेही राज्यमंत्री श्री.कदम यांनी यावेळी सांगितले.

गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात कसलीही कुचराई सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही राज्यमंत्री श्री.कदम यांनी सांगितले.

यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात येणार असून त्यात संबंधित प्रकरणांवर सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, ॲड.अनिल परब, परिणय फुके, भाई जगताप आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या लक्षवेधी सूचनेमध्ये सहभाग घेतला.

0000

संबंधित पोस्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,

ग्रामीण भागातील नागरिकांनापिण्याचे पाणी उपलब्धत करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी

vishwatmaklokswamivarta

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक!**धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश . अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती