
ओबीसी संघटनांचे उद्यापासून महिनाभर आंदोलन
प्रतिनिधी, महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना उद्यापासून महिनाभर आंदोलन करणार आहेत ओबीसी संघटना च्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मागणी होत आहे
मराठा आरक्षणासाठी उद्या (१६जून)पासून मूक मोर्चांना सुरुवात आहे. तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी संघटना उद्यापासून महिनाभर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा प्रारंभ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणार आहे. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले. परवा (१७ जून) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाभरात ‘रस्ता रोको’ आंदोलनाने याची सुरुवात होईल.



