vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी:- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013 मधील कलम 4 अन्वये ज्या कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. व सदरच्या आस्थापेनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर नोंदणी करण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर नोंदणी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी आवाहन केले आहे.

SHE BOX पोर्टवर खाजगी आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्याची कार्यपध्दती खालील प्रमाणे SHE Box पोर्टलवर अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्यासाठी https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती नोंदवा (Private Head Office Ragistration) या टॅब वर Click करुन आवश्यक त्या सर्व महितीचा तपशिल भरुन Submit या Tab वर Click करुन अंतर्गत तक्रार समितीची महिती नोंदवता येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्यावा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

जालना दर्गाह वक्फ मालमत्तेतील अनियमिततेवर त्वरित कारवाईची मागणी अर्जदारांचे व्यवस्थापन समितीला निवेदन

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 2 हजार रोपांचे वृक्षारोपण