vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

        बुलडाणा, प्रतिनिधी : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी या तिन गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

 धोत्रानाईक येथे 1 हजार 200 पशुधन व 2 हजार 438 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 72 हजार 760 लिटर्स, वरवंड येथे 850 पशुधन व 8 हजार लोकसंख्येसाठी दोन टँकरव्दारे 1 लाख 77 हजार लिटर्स, तर धानोरी येथे 600 पशुधन व 1 हजार 55 लोकसंख्येसाठी एक टँकरव्दारे 75 हजार 300 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित; मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानाला अपघात, ५ जवानांना वीरमरण.