
विविध कंपनीचे 50 मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करून नागरिकांना पुन्हा देण्यात आले मुरबाड उपविभागीय पोलिसांची कारवाई.
प्रतिनिधी,ठाणे जिल्ह्यातील मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीला गेलेले हरवलेले मोबाईल पुन्हा नागरिकांना देण्यात आले कुळगाव पोलिस स्टेशन अंतर्गत संपूर्ण माहिती असल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली
कुळगाव पोलिस स्टेशन अंतर्गत सन 2020 व 21 या वर्षांमध्ये एकूण 50 मोबाईल हरवल्याची नोंद करण्यात आली होती त्यापैकी 15 मोबाईलचा शोध घेऊन ते मोबाईल आज रोजी माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी मुरबाड यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आले आहेत.
सदरचे मोबाईल विवो,सॅमसंग, ओपो कंपनीचे असून त्यांची अंदाजी किंमत दोन लाख रुपये असून सदर चे मोबाईल वाडा,पुणे, सांगली, परळी, कर्जत नेरळ या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेले आहेत.



