vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा..

पुणे, प्रतिनिधी: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री महाजन म्हणाले, इंद्रायणी नदीवरील पुल दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

स्वच्छ व हरित नवी मुंबईचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी यशस्वी केली महिला मिनी मॅरेथॉन

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ड्रोन व सीसीटीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन