vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

 

    सांगली, प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते. तथापि, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचेकडील दिनांक 30 जून 2025 रोजीच्या पत्रान्वये सुधारीत कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. सुधारीत कार्यपध्दतीनुसार मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि, मुंबई या नियुक्त संस्थेच्या जिल्हा वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येईल. या ठिकाणी बांधकाम कामगार प्रत्यक्ष उपस्थित राहून गृहोपयोगी वस्तू संच ताब्यात घेईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

गृहोपयोगी वस्तू संच वितरणाकरिता http://hikit.mahabocw.in/appoiniment हे संकेतस्थळ सर्वांकरिता खुले करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांनी या संकेतस्थळावर जावून आपला सोईचा दिनांक व वितरण केंद्र निवडावा. तद्नंतर कामगाराने त्याने निवडलेल्या दिनांकास मंडळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व अपॉईंटमेंट लेटर घेवून वितरण केंद्रावर उपस्थित राहून ऑनलाईन प्रणाली प्रक्रियेनंतर कामगारांना प्रत्यक्ष संच ताब्यात देण्यात येईल.

 ही योजना नि:शुल्क स्वरुपाची ‍असल्याने अनुषंगिक कामकाजासाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तिसोबत आर्थिक व्यवहार करु नये, व्यवहारासंबंधी कामगारांची फसवणूक व दिशाभूल झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही. याची सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी. मंडळाची योजना नि:शुल्क असल्याने पैसे/लाचेची मागणी करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

९ ते २३ जूनदरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केली पाहणी

बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान इच्छूक पात्र संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत

पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट ३ ते ६ जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदअतिवृष्टी, भूस्खलन व दरड कोसळण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद : शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिलकार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची घोषणाबाजी…