vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

राज्य प्रतिनिधी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानात मोफत आरोग्यसेवा :• एकूण आरोग्य शिबिरे : ७,१५९• एकूण लाभार्थी रुग्ण : ३,२६,००१• एकूण पुरुष लाभार्थी : १,५६,५६०• एकूण महिला लाभार्थी : १,४१,१०८• लहान बालक लाभार्थी : २८,३३३• संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : ९,६६०• एकूण रक्तदान शिबिरे : ९५• एकूण रक्तदाते : ६,८६२

महाराष्ट्रातील ३.२६ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असून, ६,८६२ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान• सर्वाधिक शिबिरे : सोलापूर – १२३६• सर्वाधिक रुग्ण तपासणी : सोलापूर – ६२,१८१• सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे -१५९९• सर्वाधिक रक्तसंकलन : पुणे – १६५०• बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – ७८५०

गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळाली. तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार असल्याचे श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आरोग्य भवन येथे आढावा बैठक

🌱पुस्तोला क्लस्टरमध्ये एकात्मिक शेती पद्धतीसाठी नाबार्डकडून ४.४७ कोटींचा प्रकल्प मंजूर 🌱💰मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आदिवासी भागात शाश्वत उपजीविकेला चालना