vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बुलढाणा येथील घटना,बालकामगाराचा,मृत्यूप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

बुलढाणा येथील घटना,बालकामगाराचा,मृत्यूप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

प्रतिनिधी : शहरातील जाेहरनगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन शेख शोहेब शेख कलीम याचा ५ ऑगस्ट २०२० राेजी शासकीय अध्यापक विद्यालयात सफाईचे काम करीत असताना विजेचा धक्याने मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाचा तपास करून पाेलिसांनी ४ ऑगस्ट राेजी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाेहरनगर भागातील शेख शोहेब शेख कलीम हा ५ ऑगस्ट २०२० राेजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात साफसफाईचे काम करीत हाेता. यावेळी त्याला शाॅक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा बुलडाणा शहर पाेलिसांनी तपास करून ४ ऑगस्ट रोजी पोहेकाँ माधव पेटकर यांच्या फिर्यादीवरून बालकामगार ठेवणे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा सुरेश लिंगायत, सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार मुरलीधर ढगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीच्या तारखांमध्ये बदल; २७ जुलै व २८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार लोकअदालत

मुंबई पुन्हा एकदा घरे कोसळण्याची दुर्घटना, अंधेरीत कोसळली चार मजली इमारत, बेकायदेशीर बांधकाम करत असताना. 

सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवू,महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध  — वनमंत्री गणेश नाईक

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. राज्यमंत्री भारती पवार

झाडीपट्टी नाट्यकलेला राजाश्रय देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*पाचव्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे देसाईगंज येथे उद्घाटन*

राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप, भाजप नेत्याची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल….

vishwatmaklokswamivarta