vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. राज्यमंत्री भारती पवार

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. राज्यमंत्री भारती पवार

प्रतिनिधी नवी दिल्ली देशात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. दररोज ४० हजारांच्या आजपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दोन लशींचा डोस एकत्र करुन ती नागरिकांना देण्याची चर्चा देशात सुरु झाली होती. याबाबत सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रविण पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नावर लिखित स्वरुपात याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना प्रतिबंधक लशी नुकत्याच विकसित झाल्या आहेत. विविध लशींचे डोस एकत्र करण्याचे वैज्ञानिक प्रमाण नाही, शिवाय यावर अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय आरोग्य सल्लागार समुहाने आणि कोविड-१९ च्या लसीकरणावरील राष्ट्रीय तज्त्र गटाने लशीचे डोस मिक्स करण्याची शिफारस केली नाही, असं भारती पवार संसदेत म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेने आणि इतर कोणत्या तज्त्र गटाने लशींचा डोस मिक्स करण्याची शिफारस केलेली नाही. त्यामुळे तुर्तास याबाबत कसलाही विचार नसल्याचे भारती पवार यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

अखेरच्या ७२ तासांत राबवावयाच्या कायदा सुव्यवस्था उपाययोजनांचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

अनिल देशमुख अखेर ईडीच्या कार्यालयात दाखल

vishwatmaklokswamivarta

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध – अग्रिम निधी वितरित

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील जमीन फेरफार तक्रारी संदर्भात लवकरच बैठक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील..

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta