
टोक्यो ओलंपिक: भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन ‘ब्राँझ’वर नाव कोरलं.
प्रतिनिधी टोकियो – भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला तुर्कस्थानच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकासाठी दावेदारी सादर करण्याचे लवलिनाचे स्वप्न भंगले आहे.
आज झालेल्या उपांत्य लढतीत लवलिना हिला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेली हिने पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी लवलिनावर वर्चस्व राखले. अखेर तिन्ही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत बुसेनाज सुरमेनेलीने सामन्यात विजय मिळवला.
ऑलिम्पिकमध्ये लवलिना बोर्गोहाईनने जर्मनीची अऩुभवी बॉक्सर नॅडीने अॅपेत्झवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर लवलिनाने महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तैवानच्या निएन चिन चेनवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती टोक्यो ओलंपिक लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज होती.



