vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३सुधारित नियमावली नुसार अर्ज सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३सुधारित नियमावली नुसार अर्ज सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

 

 

 

            ठाणे, प्रतिनिधी:- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) या पुरस्कारांच्या नियमावलीत दि. २९ डिसेंबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.

 

या सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली असून, शासनाच्या दि. २९.१२.२०२३ रोजीचा शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट ४.४ येथे इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नुकर, सॉफ्टबॉल (पुरुष) व बेसबॉल (महिला) या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

 

सुधारीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नुकर, सॉफ्टबॉल (पुरुष) व बेसबॉल (महिला) याच खेळांमधील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. तसेच जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारामधील एरोबिक्स/अॅक्रोबॅटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू व मार्गदर्शकांनी देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

 

पुरस्काराकरीता अर्जाचा नमुना सोबत उपलब्ध करुन देण्यात आलेला असून, तो व्यवस्थितरित्या भरुन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि. २५ ते ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत,मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

कौशल्य विकासातून व्हावे आर्थिक सक्षमीकरण- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्रात टॉमेटोचे भाव गडगडले, भाव न मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने फेकले रस्त्यावर..

vishwatmaklokswamivarta