
छत्तीसगडच्या घोटीयामध्ये माओवाद्यांनी (IED) चा स्फोट घडवून आणला. गाडीतील १२ नागरिक जखमी..
रायपूर प्रतिनिधी : छत्तीसगडच्या घोटीयामध्ये गुरुवारी माओवाद्यांनी (IED) चा स्फोट घडवून आणला. यामध्ये गाडीतील १२ नागरिक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. माळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या घोटीया गावात (घोटीया गावात आज सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. रायपूरपासून (रायपूर ) ४०० किमी अंतरावर हे गाव आहे.
“या स्फोटात गाडीमध्ये बसलेले १२ नागरिक जखमी झाले. यात एका महिलेचाही समावेश आहे” असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नारायणपूरहून आलेली बोलेरो कार दंतेवाडाच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला.
स्फोट झाल्यानंतर सुरक्षापथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, माओवाद्यांनी पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी IED पेरले होते. पण नागरिकांची गाडी जात असताना स्फोट झाला.



