vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामधील दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आणि स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सदर शिबीराचा जिल्हयातील दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर, दिव्यांग बालकांचे दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड काढणे तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड काढणे हा मुख्य हेतू आहे.

शिबीरास मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून सुरूवात होईल. शिबीराच्या दिवशी तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. ज्या दिव्यांग बालकांचे दिव्यांग प्रमाणपत्र काढावयाचे आहे त्यांनी ऑनलाईन नोंदणी करुनच सदर शिबीरास हजर रहावे, तसेच दिव्यांग बालकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढणे, आभा कार्ड काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. सोबत येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बालकांनी याचा लाभ घ्यावा असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा तर्फे आवाहन करण्यात येत आहे. शिबीरामध्ये सहभागी होणा-या बालकांनी या कार्यालयास संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता जिल्हा न्यायालय, सातारा इमारतीच्या पाठीमागे, ५१५, सदर बझार, सातारा, संपर्क क्र. ८५९१९०३६११.

 

0000

संबंधित पोस्ट

विशेष लेख :-उन्हाळ्यातील जनावरांचे चारा व पाणी व्यवस्थापन

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले  १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान व्यापक सर्वेक्षण…

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

क्षयरोगाच्या लवकर निदानासाठी आयुष डॉक्टरांचे सीएमई प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा शहरात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम;० ते ५ वर्षांच्या बालकांना डोस पाजण्याचे आवाहन