vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

अमरावती, प्रतिनिधी : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व पर्यावरण संतुलनासाठी मांजरखेड, ता. धामणगाव येथे बांबू परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले.या परिषदेला आमदार प्रताप अडसड, सरपंच पल्लवी देशमुख, नंदूभाऊ खेरडे, शैलेश खेरडे, बांबू लागवड तज्ज्ञ संजय चरपे, तालुका कृषी अधिकारी संचित भाकरे, रावसाहेब रोठे, प्रदिप जळीत आदी उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, बांबू लागवडीकडे पंजाब आणि अमेरीकेसारख्या देशाने दुर्लक्ष केले आहे. बांबूमध्ये कार्बनचे प्रमाण कमी करण्याची क्षमता आहे. बांबूचे विविध उपयोग होत आहे. बांबूपासून कपडे, शाल तसेच लोणचेही बनविता येते. मात्र आपल्याकडे याची माहिती आणि महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. आपल्या क्षेत्रात बांबू नसल्याने त्यावर आधारीत उद्योगही कमी आले आहेत. बांबूची लागवड झाल्यास उद्योग येण्यास मदत होणार आहे. रोजगार हमी योजनेतून बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चार वर्षात सात लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाल्याकाठी बांबू लागवड करावी. यामुळे जमिनीला पकड राहत असल्याने बांबूचा उपयोग पूर प्रतिबंधक म्हणून होतो. त्यासोबतच वादळाचा सामना करण्यासाठीही बांबू उपयोगी पडत असल्याचे सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल –

कोकण विभागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई (उपनगर), पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध..