vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती,गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती,गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

     रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- मॅट्रिक पर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर विजाभज, इमाव व विमान या प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवत्ती/गुणवत्ता शिष्यवत्ती योजनांचे लाभाचे अर्ज नोदणी सुरु झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण या विभाग कडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती/ गुणवत्ता शिष्यवृत्ती राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 5 वी ते 7वी पर्यंतच्या मुलीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इतर मागासवर्गीय प्रवगांतील 8 वी ते 10 वी इयत्तेतील मुलीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आठवी ते दहावीत शिकणाऱ्या व्हीजेएंटी आणि एसबीसी मुलीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या VJNT SBC विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती, पाचवी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या व्हीजेएनटी आणि एसबीसी मुलीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, ट्यूशन फी आणि परीक्षा फी भरणे (VINT किवा SBC), सैनिकी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता.

अर्ज प्रक्रिया :- महाडीबीटी पोर्टलवरवर ऑनलाईन अर्ज करणे (पोर्टल लिंक https://prematricdbtworkflow.mahait.org/), प्रथमता महाडीबीटी पोर्टलवरवर शाळांच्या मुख्याध्यापकांनी (महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXX Principal आणि पासवर्डमध्ये Pass@ १२३ टाइप करून लॉग इन करा), मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मुख्याध्यापकांच्या लॉगीन मधून भरणे, अर्ज भरल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांना फोरवर्ड करणे, गटशिक्षणाधिकारी कडून अर्ज इतर मागास बहुजन कल्याण रायगड अलिबाग या कार्यलयाकडे फॉरवर्ड करणे, शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार. अटी व निरीक्षण :- आधार क्रमांक बँक खाते क्रमांकला लिंक असणे आवश्यक, सदर विद्यार्थी इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावा.हे अर्ज लिंक https://prematricdhtworkflow.mahait.org, या पोर्टलवर मुख्याध्यापकांनी पात्र शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरून फॉरवर्ड करणे.

000000

संबंधित पोस्ट

समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे यशस्वी डेस्टिनेशन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंडो- अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद २०२६

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित.

vishwatmaklokswamivarta

तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

व्यसन दुष्परिणामाबाबत प्रत्येक शाळेत20 फेब्रुवारी, 11 मार्चला परिपाठ – जिल्हाधिकारी अशोक काकडे- व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन- तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा…

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत