vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतात या झायडस कॅडिलाच्या एका लसीला मिळू शकते मान्यता..

भारतात या झायडस कॅडिलाच्या एका लसीला मिळू शकते मान्यता..

नवी दिल्ली: प्रतिनिधी  ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) या आठवड्यात झायडस कॅडिलाच्या   लसीला मान्यता देण्याची शक्यता आहे. झायकोव्ह-डी ही भारतात मान्यता मिळवणारी सहावी लस ठरेल. झायकोव्ह-डी (ZyCoV-D) च्या लसीला आपातकालीन मान्यता मिळवण्यासाठी अर्ज केल्याचे झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जाहीर केले होते.

डीसीजीआयची तज्ज्ञ समिती एसईसी या आठवड्यात लसीला मान्यता देण्याची शक्यता आहे. सोमवारी एएनआयने हे वृत्त दिले आहे. झायकोव्ह-डी डीएनए आधारीत लस आहे. रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी व्हायरसमधल्या डीएनए किंवा आरएनएचा वापर करण्यात आला आहे.

देशभरातील ५० केंद्रावर या लसीच्या चाचण्या झाल्या आहेत. १२ ते १८ वयोगटावर सुद्धा या लसीच्या चाचण्या सुरु आहेत. मागच्या आठवड्यात भारतात जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला मान्यता देण्यात आली. सिरमची कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन, रशियाची स्पुटनिक व्ही आणि अमेरिकेची मॉर्डना या लसींना भारतात आधीच मान्यता देण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत ५०.८६ कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत

संबंधित पोस्ट

पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार- मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर, या दिग्गजांचाही यादीत समावेश…

vishwatmaklokswamivarta

जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीशकुमार यांची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड तर उद्या दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील.

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

vishwatmaklokswamivarta

कोयनेतील १२ टीएमसी अतिरीक्त पाणी उपलब्धतेची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणीउपसा सिंचन योजनांच्या प्रलंबित वीज देयकासाठी 35 कोटींची मागणी

vishwatmaklokswamivarta