vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

जालना प्रतिनिधी : प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावीत. तसेच यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय इमारत व नव्याने तयार करण्यात आलेल्या नियोजन भवनाच्या पाहणी प्रसंगी दिले.

यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार सतिष चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी न्रमता चाटे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. प्रशासकीय इमारत व नियोजन भवन येथील देखभाल दूरुस्ती सह इतर कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्याकडून कामाबाबतची सविस्तर माहिती घेतली. तसेच सदर कामे करतांना सुरक्षितेच्यादृष्टीने प्रामुख्याने वीज, सोलर पॅनल, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा दर्जेदार कराव्यात. सदर कामे पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीसह कार्यालय व परिसर नेहमी स्वच्छ राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

****

संबंधित पोस्ट

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

नमुंमपा शाळांतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम करतात – वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश  नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही आज १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न