vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु- रुपाली चाकणकर – राज्य महिला आयोग

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु- रुपाली चाकणकर – राज्य महिला आयोग

सातारा प्रतिनिधी: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची पोलीस विभाग व फॉरेन्सिक लॅब असे सर्व विभाग पारदर्शकपणे तपास करत असून, राज्य महिला आयोग स्वतः यावर लक्ष ठेवून आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

श्रीमती चाकणकर यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयात जावून घटने विषयी सखोल चौकशी केली. यावेळी आमदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे, महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आत्महत्या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि लोकेशन डिटेक्शनची मदत घेतली जात आहे. तपासामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, असे सांगून शासकीय, अशासकीय आस्थापनांमधील अंतर्गत तक्रार निवारण समित्या प्रभावीपणे काम करतात की नाही यासाठी या समित्यांचे वर्षातून दोन वेळा ऑडिट व्हावे असे निर्देशितही महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकरणकर यांनी दिले

संबंधित पोस्ट

दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,एस टी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार,

vishwatmaklokswamivarta

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा;कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे – डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta