vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा..

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा..

लातूर, प्रतिनिधी : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता 1 ऑक्टोबर, 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार 1 ते 24 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकृतीचे कामकाज करण्यात आलेले आहे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (काँम्प्युटर बेसड टेस्ट) 13 ते 14 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेस्थळावर https://mahabhumi.gov.in या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेस्थळावर देण्यात आलेल्या सूचनानुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवरांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाहीसामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने (काँम्प्युटर बेसड टेस्ट) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराच्या परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिताची लिं‍क विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे भूमि अभिलेखचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक डॉ. सुहासे दिवसे यांनी कळविले आहे.

****

संबंधित पोस्ट

नांदुरा नगरपरिषद निवडणूक: भाजपाची सरशी; मंगला मुऱ्हेकर नगराध्यक्षपदी विजयी

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र; ई.के.वाय.सी. फक्त १४ हजार जणांचे पूर्णआधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद!गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी….

सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त कर्मचाऱ्यांना दिलासा अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित- सचिव तुकाराम मुंढे

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा-भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta