vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकवला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकवला…

अयोध्या प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकवला. अयोध्या ही अशी भूमी आहे, जिथे आदर्श आचरणात रुपांतरित होतात. श्रीराम मंदिराचा हा भव्यदिव्य परिसर भारताच्या सामूहिक शक्तीच्या जाणिवेचं ठिकाण बनत आहे – यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

अयोध्येत आयोजित भव्य सोहळ्यात श्रीराम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना, शेकडो वर्षांपासून प्रतीक्षित जन्मभूमी मंदिराला पूर्णत्व प्राप्त झाले आहे आज  श्रीराम लल्लाच्या मंदिरावर फडकलेला हा धर्मध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराज्याचा संकल्प केला अधोरेखित.

आपण भगवान रामांकडून शिकले पाहिजे. आपण त्यांच्या चारित्र्याची खोली समजून घेतली पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे जीवन आणि आचरणाचा सर्वोच्च दर्जा. राम म्हणजे सर्वोच्च सद्गुणांचे जीवन. राम धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो

यावेळी ते म्हणाले की राम मंदिराचे दिव्य परिसर भारताच्या सामूहिक शक्तीचे पवित्र प्रतीक म्हणून उदयास येत आहे. इथे सप्त मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. माता शबरीचे मंदिर हे आदिवासी समुदायाच्या प्रेमाचे, भक्तीचे मूर्त स्वरूप आहे. निषादराजचे मंदिर त्या मैत्रीचे प्रतीक आहे जी भौतिक साधनांचा नव्हे तर त्यामागील उदात्त उद्देशाचा आणि भावनेच्या शुद्धतेचा सन्मान करते –  हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही, तर तो भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. त्याचा भगवा रंग, त्यावर चित्रित सूर्यवंशाचे वैभव, पवित्र प्रतीक “ओम” आणि कोरलेले कोविदार वृक्ष एकत्रितपणे रामराज्याच्या शाश्वत वैभवाचे प्रतीक आहेत –  धर्मध्वज संकल्पाचे प्रतीक आहे. हा धर्मध्वज संघर्षातून जन्मलेल्या विजयाची गाथा आहे. हा धर्मध्वज शतकानुशतके जगत असलेल्या स्वप्नाचे साकार रूप आहे. संतांच्या भक्तीचे आणि समाजाच्या सामूहिक सहभागाचे हे पवित्र फळ आहे. येणाऱ्या शतकानुशतके आणि सहस्रकापर्यंत, हा धर्मध्वज भगवान रामांचे आदर्श आणि तत्वे घोषित करत राहील,

आपण एक चैतन्यशील समाज आहोत… आपण दूरदृष्टीने काम केले पाहिजे…आपण येणारी दशके, येणारी शतके लक्षात ठेवली पाहिजेत.- असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणाले

संबंधित पोस्ट

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन*राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार*

मॉडेल सोलर व्हिलेज” साठी जिल्ह्यात १५ गावात होणार स्पर्धा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील-१ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मांतग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; अर्ज करण्याचे आवाहन