vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार …

मुंबई, प्रतिनिधी : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने कळविले आहे

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाखशेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

जिल्हा विद्युत समितीची बैठक-वितरण सुधारणा व वितरण हानी कमी करण्याच्यायोजनांना प्राधान्य द्यावे-खा.संदिपान भुमरे

सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता!- ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;- तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश- सांगली व परिसरातील मेंढीपालकांसाठी सुवर्णकाळ

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान